मान्सून पूर्व पावसाला सुरवात परंतु धरणात किती पाणी साठा ?; वाचा सविस्तर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Channel Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | 18 मे 2025 | फलटण | सध्या राज्यामध्ये मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झाली असल्याचे बघायला मिळत आहे. नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये असणाऱ्या धरणांत नक्की किती टक्के पाणी साठा आहे ? हे आपण जाणून घेवुयात…

काल शनिवार दि. 17 मे 2025 रोजी भाटघर धरणामध्ये 7.34 % पाणीसाठा आहे तर मागील वर्षी आजच्याच दिवशी 8.73 % पाणीसाठा हा भाटघर धरणामध्ये होता.

काल शनिवार दि. 17 मे 2025 रोजी वीर धरणात 40.25 % पाणीसाठा आहे तर मागील वर्षी आजच्या दिवशी 14.65 % पाणीसाठा होता.

काल शनिवार दि. 17 मे 2025 रोजी नीरा – देवधर धरणात 15.42 % पाणीसाठा आहे तर मागील वर्षी आजच्या दिवशी 8.19 % पाणीसाठा होता.

काल शनिवार दि. 17 मे 2025 रोजी गुंजवणी धरणात 20.19 % पाणीसाठा आहे तर मागील वर्षी आजच्या दिवशी 20.27 % पाणीसाठा होता.

संपूर्ण नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये काल शनिवार दि. 17 मे 2025 रोजी 16.69 % पाणीसाठा आहे तर मागील वर्षी आजच्याच दिवशी 10.63 % पाणीसाठा हा नीरा खोऱ्यात होता.


Back to top button
Don`t copy text!