प्रविण जाधवने सरडे गावाचे नाव देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचवले : दौलतनाना शितोळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 02 जुलै 2021 । फलटण । सामान्य कुटुंबातील प्रविण जाधवची आँलंपिक मध्ये झालेली निवड अभिमानस्पद बाब असून त्याने सरडे गावचे नाव देशाच्या कानाकोपर्‍यात पोहचवले असल्याचे प्रतिपादन जयमल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी केले.

जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आँलंपिकमध्ये निवड झालेल्या सरडे ता.फलटण येथील प्रविण जाधव यांच्या आईवडीलांचा सत्कार करून संघटनेच्या वतीने 51 हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला त्यावेळी शितोळे बोलत होते.

प्रविण जाधवच्या संघर्षाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. त्याचा आदर्श तरुणांनी डोळ्यासमोर ठेवून आपआपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवावे. प्रविणला व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना आपण नेहमीच सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही शितोळे यांनी यावेळी दिली.

यावेळी राष्ट्रीय खेळाडू पूजा शेंडगे (हॉकी), स्वाती जाधव (हॉकी), ऐश्‍वर्या बेलदार (जिम्नॅस्टिक), पूजा जोरवर (टेबल टेनिस) यांचा सत्कार शितोळे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी साप्ताहिक पहिला नायक चे संपादक, साहित्यिक शत्रुघ्न जाधव, क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष संजय जाधव यांची समयोचित भाषणे झाली.

कार्यक्रमास शामराव मदने, पुनम जाधव, किरण खोमणे, नाना मदने, धनाजी जाधव, सुनील जाधव, संजय जाधव, आप्पासाहेब वाघमोडे, सुनील चव्हाण, लाला आडके, आण्णा भंडलकर, शरद भंडलकर, काळूराम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!