दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । फलटण । सन २०१० पासून अखंडपने सुरू असलेली आंबेडकरी प्रजा परिषद समाजमध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींचा गौरव करीत भिमस्फूर्ती पुरस्कार देत आहे.
जागतीक महामारी कोरोना काळात नागरिकांना सुरक्षित ठेवत फलटण शहर, तालुका आणि उपविभागात आदर्श काम केल्याबद्दल भीमस्फूर्ती पुरस्काराने प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना गौरवण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी म्हणाले, अनेक संस्था उदयास येतात, चांगले काम करतात, पण थोड्याच काळातच ठप्प होताना दिसतात. मात्र फलटणमध्ये एका दशकाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या आंबेडकरी प्रजा परिषदेचे कौतुक वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इग्नायटेड मिशन, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती आणि डाॅ बाबासाहेब विचार प्रसारक मंडळाचे सामाजिक कार्यासाठी समर्पित वृत्तीने सहभागी असलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन. फलटणच्या आंबेडकरी चळवळीच्या व्यापक कार्याची माहिती सर्वदूर पसरली असून, असेच आदर्श काम पुढे चालू राहावे असे ते म्हणाले.
यावेळी भीमस्फूर्ती पुरस्कार समितीचे सचिव मिलिंद अहिवळे आणि भीम जयंती मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान केला. याप्रसंगी योगेश धेंडे, लक्ष्मण अहिवळे, कुमार अहिवळे, शाम अहिवळे, ॲड. रोहित अहिवळे, गौतम अहिवळे, सुशांत काकडे, विकी काकडे, अक्षय काकडे, केतन सोरटे, निखिल अहिवळे, सुशांत अहिवळे, उमेश काकडे, आदि उपस्थित होते.