मातोश्री संस्था समूहाचे उपक्रम स्तुत्य – डॉ. प्रसाद जोशी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२५ | फलटण |
भाडळी बु. मधील मातोश्री संस्था समूहाने राबविलेले उपक्रम निश्चितच लोकाभिमुख आणि स्तुत्य असल्याचे मत जोशी हॉस्पिटल प्रा.लि.चे डॉ. प्रसाद जोशी यांनी व्यक्त केले.

मातोश्री विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आणि मातोश्री संस्था समूह भाडळी बु. (ता. फलटण) यांच्या विशेष प्रयत्नाने टेक महिंद्रा (पुणे) या कंपनीच्या सीएसआर फंडातून भाडळी बु. मधील जि.प.शाळेस संगणक संच (कम्प्युटर) भेट तसेच जोशी हॉस्पिटल प्रा.लि., फलटण यांच्या वतीने शंभर केशर आंबा जातीच्या रोपांचे शेतकर्‍यांना मोफत वाटप आणि मातोश्री विकास सेवा सोसायटीच्या सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अशा संयुक्त कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन केंद्रप्रमुख सौ. राजश्री कुंभार मॅडम, फलटण नमस्तेचे उपसंपादक श्री. राजकुमार गोफणे, पोलीस पाटील श्री. हनुमंत सोनवलकर, आर. बी. आय. मुंबईचे असिस्टंट मॅनेजर श्री. शुभम डांगे व श्री. सोमनाथ डांगे यांची उपस्थिती होती.

सामाजिक बांधिलकी डोळ्यांसमोर ठेवून संस्थेने केलेले काम निश्चितच कौतुकास्पद असून संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना भविष्यात निश्चित सहकार्य करू, असे प्रतिपादन डॉ. प्रसाद जोशी यांनी केले.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जि. प. केंद्रशाळा दुधेबावीच्या केंद्रप्रमुख सौ. राजश्री कुंभार यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेचे आभार मानून पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

नमस्ते फलटणचे उपसंपादक श्री. राजकुमार गोफणे यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत असताना संस्थेच्या सातत्यपूर्ण कामकाजावर प्रकाशझोत टाकला.

प्रारंभी प्रास्ताविकामध्ये मातोश्री संस्था समूहाचे संस्थापक चेअरमन श्री.मोहनराव डांगे यांनी संस्था आणि ग्रामस्थांच्या मदतीने टेक महिंद्रा या कंपनीच्या माध्यमातून भाडळी बु., सासकल, भाडळी खुर्द, तिरकवाडी तसेच झिरपवाडी येथील शाळांना प्रत्येकी एक संगणक भेट देणार असल्याचे नमूद केले. पुढील काळात व्यापक स्वरुपात समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी श्री.सदाशिव सावंत, श्री.बाबुराव डांगे, श्री.संभाजी डांगे, श्री.महादेव माने, श्री.जनार्दन डांगे, श्री.हनुमंत डांगे, श्री.महादेव जाधव, श्री.संपत डांगे, श्री.उत्तम डांगे, श्री.रघुनाथ डांगे, श्री.घमु माने, श्री.अर्जुन डांगे, श्री.पांडुरंग मुळीक, श्री.वसंतराव डांगे, श्री.माऊली मुळीक, श्री.दत्तात्रय डांगे, श्री.नामदेव डांगे, श्री.भगवान डांगे, श्री.गोविंद जाधव, श्री.रंगनाथ मदने, श्री.राजेंद्र माने, श्री.सचिन शिरतोडे, श्री.बबन भोसले, श्री.राम भोईटे, श्री.भालचंद्र डांगे, श्री.तानाजी सावंत, श्री.विकास सावंत, गणेश डांगे, सूरज गोरे, अनिकेत डांगे, नाना शेंडे, विक्रांत भोसले, धर्मेंद्र शिरतोडे, अजित बुधावले, अमोल डांगे, राजेंद्र सावंत, प्रविण डांगे, ऋषिकेश भोईटे, रोहित भोसले, विजयकुमार घाटे, अझरुद्दीन मुजावर, मुख्याध्यापक श्री.सुनील खरात, श्री.अमित जाधव सर यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ, संस्था समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते.

ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. स्वप्नील शेंडे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!