चिनी तज्ञाकडून भारतीय जवानांचे कौतुक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, बीजिंग, दि. 10 : लडाख सीमेवर भारत-चीनमध्ये तणाव निर्माण झाला असताना चीनच्या लष्करी तज्ञाने भारतीय सैन्यांच्या ताकदीचे कौतुक केले आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठी आणि पठारी व डोंगराळ भागातील कामाचा अनुभव असणारे सैन्य आहे. तिबेटसारख्या भागात भारतासाठी हीच मोठी जमेची बाजू असल्याचे चीनच्या या तज्ञाने म्हटले आहे.

मॉडर्न वेपनरी नियतकालिकाचे वरिष्ठ संपादक हुआंग जुओझी यांनी याबाबत एक लेख लिहिला असून भारतीय सैन्यांवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. सध्या भारताकडे पठारी प्रदेशात काम करण्याचा अनुभव असलेले सर्वात मोठे सैन्य आहे. ही सैनिक ताकद अमेरिका, रशियाच नव्हे तर कोणत्याही युरोपियन देशांकडे नाही. मागील काही काळात पहिल्यांदाच चिनी तज्ञांनी भारतीय जवानांचे कौतुक केले आहे. हुआंग यांनी म्हटले, की 12 विभागात दोन लाखांहून अधिक जवानांसह भारताचे सैनिकी बळ जगात सर्वाधिक आहे. 1970 नंतर भारतीय लष्कराने डोंगराळ प्रदेशाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर सैनिकी बळ वाढवले आहे. त्याशिवाय भारताकडे 50 हजार स्ट्राइक फोर्स तयार ठेवण्याची योजना तयार आहे.

हुआंग यांनी म्हटले, की डोंगराळ प्रदेशात नियुक्ती असणार्‍या जवानाला गिर्यारोहण करता येणे आवश्यक आहे. त्यामुळेच भारताने मोठ्या संख्येने व्यावसायिक आणि नवीन गिर्यारोहकांची खासगी क्षेत्रातून भरती केली आहे. सियाचीन सारख्या भागामध्ये भारताने शेकडो आउटपोस्ट तयार केल्या आहेत. त्यामध्ये 5 हजार मीटर उंचावरील चौक्यांचा समावेश आहे. सर्वात उंचावरील चौकी 6749 मीटरवर असल्याचे त्यांनी म्हटले.

भारताची शस्त्रसज्जताही वाखाणण्यासारखी असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय जवानांकडे उंचावरील भूभागात आणि कोणत्याही वातावरणात कामी येणारी मोठ्या संख्येने शस्त्रे आहेत. भारताने काही शस्त्रे परदेशातून खरेदी केली. त्यानंतर देशातच या शस्त्रांची निर्मिती केली. भारतीय सैन्य शस्त्रांच्याबाबतीत पूर्णपणे सक्षम नसून अमेरिकेवर अवलंबून राहवे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!