प्रदीप ढुके यांची राष्ट्रीय शिवदुर्ग संवर्धन समिती अध्यक्षपदी नियुक्ती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑक्टोबर २०२३ | बारामती |
बारामती तालुका मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष प्रदीप ढुके यांची राष्ट्रीय शिवदुर्ग संवर्धन समीती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त मावळा जवान संघटना आयोजित पहिली राष्ट्रीय मावळा परिषद व छत्रपती शिवाजी महाराज ‘ए ग्रेट वर्ल्ड लीडर’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन व नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम पुणे येथे संपन्न झाला. याप्रसंगी ढुके यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

कार्यक्रमास श्रीमंत शिवाजीराजे भोसले प्रिन्स ऑफ तंजावर, तमिळनाडू व आमदार भीमराव तापकीर, इतिहास लेखक, संशोधक, संस्थापक अध्यक्ष मावळा जवान संघटना दत्ताजी नलावडे व रोहित नलावडे, सौ. अर्चनाताई सातव, नितीन मांडगे, शुभम जामदार, सौरभ देशपांडे, रमेश मरळ-देशमुख, दत्तात्रय हरिहर, सौ.दिपाली जाधव, सौ.अर्चना ढुके उपस्थित होत्या.

गडकोट स्वच्छता, गडकोट मोहिमेच्या माध्यमातून दुर्गसंवर्धनासाठी युवकाचा सहभाग वाढविणे

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगातील पहिल्या लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्राची हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. भारतासह विश्वाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. शिवरायांचे गडकोट, जलदुर्ग, भुईकोट हे राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थान आहेत. शिवरायांचा मानवतावादी लोककल्याणकारी कार्याचा, शौर्याचा वारसा गडकोटांना आहे. अनेक गडकोटांचा वारसा संवर्धनाअभावी लुप्त पावत चालला आहे. गडकोटांच्या संवर्धनातून शिवरायांच्या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नव्या पिढीत जागृत व्हावा यासाठी जोमाने कार्य करू, असे निवडीनंतर प्रदीप ढुके यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!