स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

प्रवचने – नामाचे सूक्ष्म स्वरूप

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 12, 2023
in इतर, देश विदेश, प्रादेशिक, फलटण, बारामती, लेख, संपादकीय, सातारा जिल्हा

नुसते ‘राम राम’ म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो, आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की, समजा एखादा मनुष्य ‘नोकरी नोकरी’ असा जप करीत खोलीत बसला, तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का ? वरकरणी हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा, पण थोडासा विचार केला, तर तो इथे मुळीच लागू पडत नाही, असे कळून येईल. जो दाखला द्यायचा, आणि ज्या बाबतीत तो द्यायचा, त्यांचे गुणधर्म सारखे असावे लागतात. ‘रामनाम’ आणि ‘नोकरी’ यांचे परिणाम एकमेकांविरूद्ध आहेत. ‘राम राम’ म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजे स्वत:च्या विस्मरणात होत असतो; म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे, म्हणजे स्थूलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे, हा ‘राम राम’ म्हणण्याचा परिणाम. परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरूद्ध आहे. मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे. नंतर, ती मिळावी म्हणून दहाजणांचे आर्जव करायचे, त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा, आणि मग आपण ती नोकरी करायची. म्हणजे नोकरी या कल्पनेतून, सूक्ष्मातून, स्थूलात जाणे हा नोकरीचा प्रकार. पण ‘राम राम’ म्हणणे हा प्रकार स्थूलांतून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे. यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे ‘नोकरी नोकरी’ असा जप करून नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच, पण ‘राम राम’ म्हणून राम मिळणे कसे सोपे, किंबहुना कसे हमखास शक्य आहे हे पहा. नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून, ती प्रत्यक्षात आणण्याकरिता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते, हे आपण आत्ताच पाहिले. तसेच, घर बांधणे ही कल्पना; ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे आगर व्हावे या हेतूने सर्व जिनसा पैदा करून त्यात आणून ठेवणे, म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला. आता हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे. ‘राम राम’ म्हणण्याचे उद्दिष्ट, स्थूलांतून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे; म्हणजेच, अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एकेक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे. ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे. तेव्हा ‘नोकरी नोकरी’ म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण, तितकेच ‘राम राम’ म्हणून राम मिळणे निश्चित आहे. सबब ‘राम राम’ म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता ‘राम राम’ जपावे.

मनाच्या सर्व दु:खाला कारण देहबुद्धी आहे. ती जायला उपाय एकच; प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे. त्याच्या योगाने सर्व मल जाईल. नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल. चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे. ‘मी’ पणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे.

जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदु:खाची जाणीव राहणार नाही. तो आनंदात राहील.


Previous Post

वसतिगृह मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण

Next Post

वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी – मंत्री शंभूराज देसाई

Next Post

वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी – मंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी कॉलेजेमध्ये शहीद वीर व राष्ट्रनिर्मात्याना मानवंदना

January 28, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या गट क्र. २२ च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

January 28, 2023

“तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान

January 28, 2023

कीर्तन परंपरेचा आजच्या काळात नव्याने अभ्यास होणे गरजेचे – प्रा. डॉ. धनंजय होनमाने

January 28, 2023

भारतीय बौद्ध महासभा अंकुर बौद्ध विहार शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

January 28, 2023

प्रजासत्ताक दिनी आटपाडीत प्रथमच सागर यांनी केली सत्यशोधक वास्तू पूजन

January 28, 2023

पारसिक बोगद्यामुळे प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 28, 2023

भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प करा – हेमंत पाटील

January 28, 2023

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परीक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 28, 2023

धर्मवीर आनंद दिघे यांना मुख्यमंत्री शिंदे यांची आदरांजली

January 28, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!