स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सातारा नगर परिषदेकडून प्रभात फेरीचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । सातारा । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सातरा नगर परिषदेतर्फे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. हि प्रभात गोल बाग राजवाडा ते छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, पोवई नाका अशी काढण्यात आली होती.

या प्रभात फेरीमध्ये सातारा नगरपरिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, लेखापाल आरती नांगरे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

राजवाडा गोलबाग येथे राष्ट्रगीत म्हणून तिरंगा प्रभात फेरी सुरुवात करण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा उत्स्फूर्तपणे देत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी शिस्तबध्द पध्दतीने तिरंगा रॅली काढली होती. या तिरंगा रॅलीमध्ये नगरपरिषदेच्या वाहतुक व अग्निशमन विभागाकडील सर्व वाहने सहभागी झाले होती. रॅली मध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून विविध प्रकारचे होर्डिंग्ज लावून हर घर तिरंगा अभियानाचा प्रचार करण्यात आला.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 13 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी आपापल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन पालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी श्री. पराग कोडगुले यांनी केले.

शिवतीर्थ पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!