
दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२२ । फलटण । लोणीकंद ते चाकण दरम्यान असलेल्या महापारेषणच्या विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे आज पहाटेपासून पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे व सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.
महाराष्ट्रराज्य विद्युत वितरण कंपनीच्या 400 KV अतिउच्च दाब वाहिन्यांवर तांत्रिक बिघाड झालेला आहे. MSEDCL मार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे. तथापी काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे व सातारा जिल्ह्यातील बहुतांश भाग हा अंधारात गेलेला आहे. वर्क फॉर्म होम मधील कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					