सलग चौथ्या दिवशी बाजारात सकारात्मक स्थिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


निफ्टी १० हजारांच्या पातळीच्या पुढे, सेन्सेक्स ५१९.११ अंकांनी वाढला

स्थैर्य, मुंबई, 23 : विविध क्षेत्रांमध्ये खरेदीने आधार दिल्याने शेअर बाजार आज सलग चौथ्या दिवशी सकारात्मक स्थितीत दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले. आजच्या व्यापारी सत्रात निफ्टीने १० हजारांच्या पातळीपुढे धाव घेतली. निफ्टीत १.५५% किंवा १५९.८० अंकांची वाढ झाली. तो १०.४७१.०० वर बंद झाला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.४९% किंवा ५१९.११ अंकांनी वाढून ३५,४२०.४३ वर बंद झाला. जवळपास १९२९ शेअर्स नफ्यात होते, ७४९ शेअर्स घसरले तर १४३ शेअर्सची स्थिती बदलली नाही.

बजाज फायनान्स (९.२८%), एलअँडटी (६.७३%), एनटीपीसी (५.७७%), इंडसइंड बँक (६.५३%) आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज (५.४३%) हे बाजारातील टॉप मार्केट गेनर्स ठरले. रिलायन्स इंडस्ट्रीज (१.४०%), भारती एअरटेल (०.६३%), वेदांता (०.१४%) आणि मारुती सुझुकी (०.१०%) हे आजच्या सत्रातील बाजाराती टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप १.६९% नी वाढले तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये १.७८% ची वाढ दिसून आली.

इक्विटी बाजारातील गुंतवणुकदारांच्या सकारात्मक भावनांमुळे आज भारतीय रुपयाने सलग दुसऱ्या दिवशी सकारात्मक स्थिती दर्शवली. त्यामुळे अमेरिकी डॉलर थोडा कमकुवत झाला. अमेरिकी डॉलरच्या तुलननेत भारतीय रुपया ७५.७५ रुपयांवर स्थिरावला.

अमेरिका-चीन व्यापार करारातील वाढती चिंता आणि जगभरातील कोव्हिड-१९ च्या रुग्णांची वाढती संख्या असूनही जागतिक बाजारात आज सकारात्मक व्यवहार दिसून आला. नॅसडॅक कंपनीचे शेअर्स १.११%, एफटीएसई १०० चे शेअर्स १.२२% नी आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स १.६५% तर निक्केई २२५ चे शेेअर्स ०.५० % नी वाढले. तर हँगसेंगचे शेअर्स आजच्या सत्रात १.६२% नी वधारले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!