
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सोलापूर, दि. 04 : सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात असलेला विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात येत्या दहा-पंधरा दिवसानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली. विडी उद्योग करण्यासंदर्भात विडी उद्योग प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी विडी कामगारांच्या समस्या सांगितल्या. कारखानदारांनी विडी कामगारांना ॲडव्हान्स स्वरूपात मदत करण्यासंदर्भात सूचना पालकमंत्री भरणे यांनी केल्या. सोलापुरातील कोरोना परिस्थिती पाहून शासनाच्या निकषानुसार विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
