
स्थैर्य, सातारा, दि. 28 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून शनिवार (दि. 28 सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कास पुष्प पठार येथे ’ई-वेहिकल सफारी’ गाडीचा (प्रदूषणमुक्त सफारी) शुभारंभ करण्यात आला. राज्याचे शिक्षण आयुक्त श्री. सचिंद्र प्रताप सिंह आणि त्यांच्या पत्नी श्रीमती अर्चना प्रताप सिंह यांच्या हस्ते या सफारी गाडीचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या मान्यवरांनी कास पठाराला भेट देऊन या उपक्रमाची प्रशंसा केली. पठाराला भेट देणार्या पर्यटकांनी या प्रदूषणमुक्त ई-वेहिकल सफारीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. कार्यक्रमास सातारा व मेढा वनपरिक्षेत्राचे अधिकारी संदीप जोपळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, वनपाल (बामणोली) श्रीमती उज्वला थोरात, वनपाल रोहोट राजाराम काशीद, वनरक्षक कास समाधान वाघमोडे, वनरक्षक दत्तात्रय हेर्लेकर, वनरक्षक आकाश कोळी, वनरक्षक तुषार लगड, वनरक्षक राहुल धुमाळ तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समिती कास, एकीव, आटाळी, कुसुंबी, पाटेघर, कासानीचे अध्यक्ष, सचिव व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.