दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२३ | फलटण |
रणजितसिंह मोहिते पाटील विद्यालय, जाधववाडी येथे पोलीसकाका व पोलीसदीदी अभियानानिमित्त कायदा व सुव्यवस्था, मुला-मुलींचे होणारे छेडछाडीचे प्रकार, बलात्कार याबाबतीत जागृती करणे यासाठी माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र टाकणे यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले व आपल्या संवादातून पोलिसांबद्दल वाटणारी भीती दूर करून कायद्याचे बहुमोल असे ज्ञान दिले.
यावेळी बीट अंमलदार श्री. संतोष घोगरे, श्री. नदाफ, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव, प्राचार्य नानासो घार्गे, पोलीस पाटील सोरटे, जाधववाडीचे उपसरपंच श्री. दोलतडे तसेच शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार श्री. गायकवाड सर यांनी मानले.