
दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२२ । लोणंद । कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर पहिल्यांदाच पालखी सोहळा पूर्ववत होणार असल्याने हा सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे २८ जून रोजी सातारा जिल्ह्यामध्ये लोणंद शहरात आगमन होणार आहे. लोणंद पोलिसांकडून या पालखी सोहळ्यासाठी बंदोबस्ताचे खास नियोजन केले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सन २०२२ चे अनुषंगाने मा . विषेश पोलीस महानिरीक्षक सो , कोल्हापुर व पोलीस अधिक्षक सातारा यांचे मार्गदर्शना नुसार संपुर्ण सातारा जिल्हयातील १ अप्पर पोलीस अधिक्षक, ७ डी. वाय. एस. पी, १२ पोलीस निरीक्षक, ७६ सपोनि / पोऊनि, ६१५ पोलीस जवान, १७० मपोकॉ, १६० वाहतुक पो. अंमलदरार असे एकुण ९६ पोलीस अधिकारी व अंमलदार ९४५ व ९०० पुरुष होमगार्ड व १०० महिला होमगार्ड असे एकुण १००० होमगार्ड व ०१ एस. आर. पी. एफ. कंपनी व २ क्युआरटी पथक पालखी सोहळयामध्ये बंदोबस्तास नेमणेत आले आहे. तसेच पालखी आगमन व मुक्कामाचे ठिकाणी व पालखी सोहळ्यामध्ये गर्दीचे ठिकाणी गुन्हेगार व समाज कटंकावर नजर ठेवणेकरीता व महीलांची छेडछाड, चोरी करणारे यांचेवर नियंत्रण ठेवणेसाठी खाजगी व सरकारी सीसीटीव्ही कॅमेरे ठिकठिकाणी लावणेत आले आहेत. तसेच खाजगी वेशात ०५ अधिकारी व ५० पोलीस अंमलदार तैनात करणेत आले असून सदरची पथकेही चोऱ्या, चैनस्नॅचींग रोखणेसाठी तसेच त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करणेसाठी वेगवेगळी पथके तयार करणेत आलेली आहेत.
पालखी तळावर वॉच टॉवर लावणेत आली असून दिवसपाळी व रात्रपाळी करीता एस. आर. पी. एफ व क्यु . आर. टि. ची पथके नेमणेत आलेली आहेत. तसेच पर्यायी वाहतुकीसाठी रजतसागर, पाडेगाव पाटी ते नेवसेवस्ती ते तरडगाव मार्गे असे वळविणेत आले आहे. तसेच लोकांचेमध्ये जनजागृती करणे करीता संशयास्पद / बेवारस वस्तु , बॅगा आढळुन आलेस अशी बाब तात्काळ पोलीसांचे निर्देशनास आनुन देणे करीता संपुर्ण परिसरात ठिकठिकाणी फ्लेक्स बोर्ड व जाहीरात पत्रिका लावणेत / वाटणेत आलेले आहेत. भाविकांच्या जिवित व मालांचे रक्षणासाठी रात्री व दिवसा भागातून मोबाईल पेट्रोलींग करीता वाहने नेमणेत आलेली आहेत. तसेच गुन्हेगार व समाज कटंकावर नजर ठेवणे करीता मोटर सायकलवरुन पेट्रोलींग नेमणेत आलेली आहे. तसेच लोणंद शहरात तसेच एस. टी. स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, निरा चौक, शिरवळ चौक, गांधी चौक, पालखीतळ येथे ठिकठिकाणी कॅमेरे बसविणेत आले आहेत. तसेच लोणंद शहरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी १. बिरोबा वस्ती २. गोटेमाळ ३. एमआयडीसी, लोणंद ४. कापडगाव फाटा याठिकाणी पार्कंगची सोय करणेत आलेली आहे. निरा-सातारा, लोणंद-फलटण हे रोड सदर वेळी वाहतुकीसाठी पुर्णबंद राहणार आहेत. त्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा तसेच लोणंद शहरातील नागरीकांनी पालखीकाळात आपली वाहने कमीत कमी प्रमाणात रोडवर आणावीत याबाबत अवाहन करणेत येत आहे. पोलीस अधिक्षक सो सातारा व अप्पर पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी सपुंर्ण पालखी तळाची व पालखी मार्गाची पाहणी करुन पालखी बंदोबस्तासाठी योग्य अशा सुचना केलेल्या आहेत.
बंदोबस्त प्रभारी अधिकारी : श्री . अजित बो – हाडे सो अप्पर पोलीस अधिक्षक सो , सातारा सहाय्यक बंदोबस्त प्रभारी अधिकारी : – १ ) श्री . तानाजी बरडे उप – विभागीय पो . अधिकारी सो , फलटण विभाग फलटण २ ) श्री . विशाल वायकर सपोनि लोणंद पोलीस ठाणे