दैनिक स्थैर्य । दि.२६ मार्च २०२२ । वाई । पोलीस असल्याची बतावणी करून एका ज्येष्ठ महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र व दोन बांगड्या असे सुमारे अडीच लाख रुपयांचे दागिने दोन अज्ञात इसमाने लंपास केले.
मंगळवार (दि २२) रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास वाई शहरातील मधली आळी येथील कन्या शाळा रस्त्यावर हा प्रकार घडला.
याबाबत शुभांगी प्रमोद थिटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या आपल्या पतीला जेवणाचा डबा घेऊन दुकानात जात असताना तीस पस्तीस वयाचे दोन इसम दुचाकीवरून समोरून आले.आम्ही खाजगी वेशातील पोलीस आहोत.इकडे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे त्याचे चेकिंग करत आहोत. तुम्ही सोन्याचे दागिने घालून फिरू नका असे म्हणून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व बांगड्या काढून द्या कागदात गुंडाळून देतो ते पिशवीत ठेवा असे सांगितले.त्यानंतर त्यांनी दागिने कागदात गुंडाळल्याचे भासवून पिशवीत ठेवले. मी दुकानात जाऊन पाहिले असता त्याच्यामध्ये बनावट सोन्याच्या दोन बांगड्या व दगड असल्याचे दिसून आले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमा विरुद्ध विश्वास घात व फसवणूक करून दागिने लंपास केल्याची तक्रार दाखल केली .अधिक तपास वाई पोलीस करत आहेत.