लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये पोलिसांचा ‘रुट मार्च’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
विधानसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने लोणंद पोलीस ठाणे हद्दीत आयटीबीपी कंपनी यांच्यासोबत १ नोव्हेंबर रोजी बिबी, आळजापूर, हिंगणगाव, सासवड, तरडगाव (ता. फलटण) या गावांतून रुट मार्च घेण्यात आला, अशी माहिती लोणंद पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी दिली.

या रुट मार्चमध्ये लोणंद पोलीस ठाण्याचे तीन अधिकारी, १८ पोलीस अंमलदार, तसेच आयटीबीपी कंपनीचे १ अधिकारी व २४ जवान यांनी सहभाग घेतला होता.


Back to top button
Don`t copy text!