तीन जुगार अड्डयांवर पोलिसांचा छापा


दैनिक स्थैर्य | दि. २३ जून २०२३ | सातारा |
सातारा जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी चालणार्‍या जुगार अड्डयांवर कारवाई करत पोलिसांनी ५ हजार ७० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ रोजी १.४० वाजण्याच्या सुमारास वर्णे, ता. सातारा गावच्या हद्दीत कॅनॉलजवळ तेथीलच अमोल मधुकर गाडेकर, सचिन भिकू कांबळे, दिलीप बबन पवार, पोपट हणमंत मदने यांच्याकडून २ हजार ४४० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले. त्याच दिवशी त्या परिसरात राजेंद्र विष्णू बोभाटे (रा. अंगापूर, ता. सातारा) याच्याकडून १ हजार ४६० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.

दि. २२ रोजी ६.३५ वाजण्याच्या सुमारास लिंब, ता. सातारा येथे घराच्या आडोशाला तेथीलच शब्बीर शेख याच्याकडून १ हजार ४६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.


Back to top button
Don`t copy text!