स्थैर्य, फलटण, दि.९: फलटण शहरामध्ये घडसोली मैदाना शेजारी सुरू असणाऱ्या दोन मटका, जुगार व सोरट अड्ड्यांवर धाडी टाकून मुद्देमाल जप्त केलेला आहे. अशी माहिती फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
या बाबत पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिलेली माहिती अशी की, ८ फेब्रुवारी रोजी मोती चौक फलटण येथील नगरपालिकेचे बांधकाम असलेल्या बंद गाळ्याचे आडोशाला देविदास राजेंद्र पवार रा. कोळकी हा लोकांचे कडून पैसे स्वीकारून सोरट नावाचा मटका पप्पू प्लेइंग पिक्चर असे इंग्रजी लिहिलेले असलेला त्यावर प्राणी, पक्षी, छत्री, सूर्य, बकरा पण ती पतंग असे चिन्ह असलेल्या चिन्हावर लोकांकडून पैसे ठेवून चालवीत असताना मिळून आलेला आहे. त्याच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस स्टेशन मध्ये कलम 54/2021 महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दि. ८ फेब्रुवारी रोजी फलटण येथे गडसोली मैदान नगरपालिका बंद गाळ्याच्या भिंतीच्या आडोशाला महेश नाना हुंबरे रा. रविवार पेठ, फलटण हा लोकांचे कडून पैसे स्वीकारून कल्याणचा मटका चालवित असताना मिळून आला आहे. त्याचे कब्जात 330 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून आले आहे. त्याच्या विरोधात कलम 55/2021 महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, असेही पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी स्पष्ट केले.
सदरच्या कारवाई फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. नितीन चतुरे, पो.ना. सर्जेराव सुळ, पो.ना. विक्रांत लवांड यांनी केली आहे.