दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२४ | फलटण |
संविधानात्मक अनुसूचित जमाती एस. टी. आरक्षणासाठी पंढरपूर येथील टिळक स्मारक येथे उपोषणास बसलेल्या सखल धनगर समाज, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सदस्यांना पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली (भारत) यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
पाठिंब्याचे पत्र संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोषदादा चौधरी, प्रमुख महाराष्ट्र महिला सौ. विजया नामदेव कर्णवर, राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख श्री. गजानन भाऊ भगत व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. सुनिलभाऊ पाटील, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष जीवराज गुंड पाटील, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष अमोल कांबळे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सपकाळ यांनी दिले आहे.
पत्रात म्हटले आहे की, पंढरपूर टिळक स्मारक येथे १० दिवसांपासून धनगर बांधव हे संविधानात्मक अनुसूचित जमाती एसटी आरक्षणासाठी उपोषणास बसले आहेत. या उपोषणास पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य, सोलापूर या संघटनेचा जाहीर पांठिबा असून त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य करून त्यांना त्यांच्या हक्काचे असलेले आरक्षण द्यावे.