राज्यपालांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस पदके प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ११४ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन २०२० आणि २०२१ या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके, गुणवत्तापूर्ण सेवा पदके आणि पोलीस शौर्य पदके आज राजभवन येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.

राजभवनातील दरबार हॉल येथे आयोजित पोलीस अलंकरण समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर तसेच अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

राज्य पोलीस दलातील नऊ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक, २७ जणांना पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर ७७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.

‘राष्ट्रपती पोलीस पदक’ २०२०

१) रितेश कुमार, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, २) संजीव कुमार सिंघल, अपर पोलीस महासंचालक (आस्थापना), पोलीस महासंचालक कार्यालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, ३) सुषमा शैलेंद्र चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर, ४) विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, नाशिक शहर ५) गणेश जगन्नाथ म्हेत्रस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सातारा.

‘राष्ट्रपती पोलीस पदक’ २०२१

१. प्रभात कुमार, अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई, २) डॉ. सुखविंदर सिंह, अपर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई, ३) निवृत्ती तुकाराम कदम, से.नि सहायक पोलीस आयुक्त, ठाणे शहर, ४) विलास बाळकू गंगावणे,  से.नि सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.

‘पोलीस शौर्य पदक’ 2020

१) राजेश ज्ञानोबा खांडवे, पोलीस निरीक्षक २) मनीष पुंडलिक गोरले, पोलीस हवालदार ३) गोवर्धन जनार्दन वाढई, पोलीस नाईक, ४) कैलास काशीराम उसेंडी पोलीस नाईक  ५) कुमारशाहा वासुदेव किरंगे, पोलीस नाईक, ६) शिवलाल रुपसिंग हिडको, पोलीस शिपाई, ७) राकेश रामसू हिचामी, सहायक पोलीस उप निरीक्षक ८) वसंत नानका तडवी, पोलीस शिपाई ९) सुभाष पांडुरंग उसेंडी, पोलीस शिपाई १०) रमेश वेंकन्ना कोमीरे, पोलीस शिपाई ११) सुरेश दुर्गूजी कोवासे, सहायक पोलीस उप निरीक्षक १२) रतिराम रघुराम पोरेटी, सहायक पोलीस उप निरीक्षक.,१३) प्रदीपकुमार रायभान गेडाम, पोलीस हवालदार १४) राकेश महादेव नरोटे, पोलीस हवालदार

‘पोलीस शौर्य पदक’ 2021

1) आर. राजा, पोलीस उपायुक्त. 2) नागनाथ गुरुसिद्ध पाटील, सहायक पोलीस निरीक्षक 3) महादेव मारोती मडावी, पोलीस हवालदार 4) कमलेश अशोक अर्का, पोलीस नाईक. 5) अमुल श्रीराम जगताप, पोलीस नाईक, 6) वेल्ला कोरके आत्राम, पोलीस नाईक 7) हेमंत कोरके मडावी, पोलीस शिपाई 8) सुधाकर मलय्या मोगलीवार, पोलीस शिपाई 9) बियेश्वर विष्णू गेडाम, पोलीस शिपाई 10) हरि बालाजी एन., पोलीस उप आयुक्त 11) निलेश मारोती ढुमणे, पोलीस हवालदार 12) गिरीश मारोती ढेकले, पोलीस शिपाई 13) गजानन दत्तात्रय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.


Back to top button
Don`t copy text!