जिल्ह्यातील 27 गुन्हेगारांवर मोक्कांतर्गत कारवाई तीन टोळ्यांना पोलिस दलाचा दणका 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.११: सातारा जिल्ह्यातील तीन गुन्हेगारी टोळ्यांतील  तब्बल 27 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अक्षय लालासो  उर्फ लालासाहेब पवार, रा. रविवारपेठ, सातारा याच्या टोळीतील तिघेजण, निखील  प्रकाश वाघमळे रा. अंबवडे ता. कोरेगाव याच्या टोळीतील 6 जण तर अनिकेत  उर्फ बंटी नारायण जाधव, रा. भुईंज ता. वाई याच्या टोळीतील 18 जणांचा यात  समावेश आहे.
आर्थिक लाभासाठी सुपारी घेवून खून, अपहरण, दरोडा, खंडणी  अशा गंभीर गुन्ह्यातील नामचीन गुंडांचे यामुळे धाबे दणाणले आहे.

याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत माहिती  दिली. 1) टोळी प्रमुख अक्षय लालासो उर्फ लालासाहेब पवार याने व त्याचे 2 साथीदार  यांनी किन्हई गावचे हद्दीत फिर्यादी यांनी वाळू काढण्यासाठी मजूर पुरवावेत या क ारणाकरीता जिवे ठार मारण्याचे उद्देशाने देशी बनावटीचे पिस्टल मधून कानाशेजारी  1 राऊंड फायर केला. याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असले गुन्ह्यामध्ये  मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्यामध्ये एकुण 3 आरोपी  असून अक्षय लालासो उर्फ लालासाहेब पवार यास अटक करण्यात आलेली आहे व  उर्वरीत दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्ह्यातील पिस्टल जप्त करण्यात आलेले  आहे. गुन्ह्याचा प्रस्ताव प्रभाकर मोरे, पोलीस निरीक्षक, कोरेगाव पो.स्टे. यांनी  पाठवला असून उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे करत आहेत. टोळीवर  एकूण 21 गुन्हे दाखल आहेत. मोक्का प्रस्ताव मंजुरीस पाठवण्यासाठी एलसीबीचे पो नि  किशोर धुमाळ, संतोष साळुखे, सहायक पोलीस निरीक्षक, कोरेगाव पो.स्टे.,  पो.हवा. प्रविण शिंदे, स्थागुशा, पो.ना.अमोल सपकाळ, कोरेगाव पो.स्टे. यांनी प रिश्रम घेतले आहेत.

दुसर्‍या टोळीतील 6 जणांवर मोक्का लावला आहे. टोळी प्रमुख निखील प्रकाश  वाघमळे रा. अंबवडे ता.कोरेगाव व त्याचे इतर 5 साथीदार यांनी फिर्यादी हे त्यांचे  ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रक सातारा वाढे फाटा मार्गे लोणंद बाजूकडे जात  असताना पाटखळ ता.जि. सातारा येथील हॉटेल शिदोरी समोर, आरोपींनी  पाठीमागून इंडोवर गाडीतून येवून ट्रकला ओव्हरटेक करून, फिर्यादीचे ट्रकला इंडोवर  गाडी आडवी मारून, ट्रक थांबवून, इंडोवर गाडीमधून खाली उतरुन, फिर्यादीने गाडी  ठोकलेचा बहाणा करून, ट्रकचे केबीनचे दार उघडून फिर्यादीस व क्लिनर यास  खाली ओढून हाताने लाथाबुक्यांनी मारहाण करून, ट्रकचे ड्राव्हरमधील 8 हजार  जबरदस्तीने चोरून नेले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाणेस अज्ञात आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर टोळी प्रमुख निखील प्रकाश वाघमळे या अटक के ली तर 1 विधीसंघर्षीत बालकाचा ताबा घेण्यात आलेला होता. तपासामध्ये दोन  आरोपी निष्पन्न झालेले असून 2 अनोळखी आहेत. गुन्ह्याचा प्रस्ताव सजन हंकारे  पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पो.स्टे. यांनी पाठविला असून श्रीमती आँचल  दलाल, सहायक पोलीस अधीक्षक,सातारा सिटी विभाग सातारा या करीत आहेत.  टोळीवर एकूण 6 गुन्हे दाखल आहेत. या मोक्का प्रस्ताव मंजुरीस पाठवण्यासाठी  एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ, उपनिरीक्षक एम.आर.फरांदे, हवालदार प्रविण  शिंदे, स्थागुशा, पो.शि.महेश शिंदे, सातारा तालुका पो.स्टे. यांनी परिश्रम घेतले  आहेत.

आसले, ता. वाई गावातील निर्घृण खुनामुळे जिल्हा हादरला होता. याप्रकरणी टोळी  प्रमुख अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव रा. भुईंज व त्याच्या 17 साथीदारांवर  मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे.  संबंधित 18 आरोपींनी कट करुन आरोपी रोहण  जाधव याच्या बहिनीस मयत ओंकार कैलास चव्हाण वय 30 रा. आसले हे त्रास  देत असल्याचा राग मनात धरून-चिडून जावून मयतास पाचवड येथील शेवाळे  वस्तीजवळून, जबरदस्तीने मोटर सायकलवरुन पळवून नेवून, भुईंज ता. वाई गावचे  हद्दीत कृष्णा नदीच्या काठाजवळ आंब्याच्या झाडाखाली नेवून, त्यास कळकाच्या  काठीने मारहाण करून, हातातील सोन्याची अंगठी व जवळील मोबाईल फोन  जबरीने काढून घेवून त्याचा खुन केला. त्याचे प्रेत भुईंज गावच्या सार्वजनिक  स्मशान भुमीमध्ये जाळून प्रेताची राख नदीचे पाण्याचे पात्रात टाकून पुरावा नष्ट के ला. तसेच साक्षीदार यासही शेडवर नेवून मयताप्रमाणे त्याला खोलीच्या छताच्या  अँगलला दोरीने उलटे बांधून अमानुषपे काठयांनी व गुप्त भागावर मारहाण करुन  त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मनुष्य मिसींग रजि. नंबर- 02/2021 चे चौकशीमध्ये सरकारतर्फे फिर्याद दिली असून गुन्ह्यामध्ये एकुण 9  आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरीत 9 जणांचा शोध सुरू आहे. या  गुन्ह्याचा प्रस्ताव पोलीस भुईंज पोलीस ठाण्याचे निरीक्षक आशिष कांबळे यांनी पाठ विला असून श्रीमती डॉ.शितल जानवे-खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई  विभाग वाई या तपास करीत आहेत. टोळीवर एकुण -26 गुन्हे दाखल असून मोक्का  प्रस्ताव मंजुरीस पाठवण्यसाठी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक किशोर  धुमाळ, हवालदार प्रविण शिंदे, विकास गंगावणे, यांनी परिश्रम घेतले आहेत.

मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे

1) टोळी प्रमुख -1) अक्षय लालासो उर्फ लालासाहेब पवार  (अटक)

2) टोळी प्रमुख – 1) निखील प्रकाश वाघमळे रा. अंबवडे ता. कोरेगाव हल्ली रा.  आरळे ता.जि. सातारा (अटक)टोळी सदस्य – 2) विधीसंघर्षग्रस्त बालक (ताबा)

3) रोहन राजेंद्र जाधव वय- 19 वर्ष रा. घुमटाचे शेजारी, भुईंज ता. वाई (अटक) रोहित संजय घाडगे वय- 20 वर्ष रा. समतानगर, भुईंज ता. वाई (अटक)समाधान उर्फ चंप्या राजेंद्र शिंदे वय-19 वर्ष रा. आनंदविहारचे पाठीमागे,भुईंज ता.  वाई (अटक)सलिम खाजासाब शेख वय-19 वर्ष रा. भिमनगर, भुईंज ता.वाई जि. सातारा  (अटक)जयेश उर्फ बंटी शामराव मोरे वय-32 रा. मालदेववाडी ता. वाई (अटक)अमित उर्फ गोट्या अविनाश भोसले वय- 33 वर्ष रा समतानगर भुईंज ता. वाई  (अटक)अक्षय संजीव जाधव वय- 21 वर्ष रा.घुमटाजवळ, भुईंज ता. वाई (अटक) वरुण उर्फ यश समरसिंह जाधव वय- 23 वर्ष रा. घुमटाजवळ, भुईंज (अटक) महेंद्र उर्फ पिंटू हणमंत जाधव वय- 46 वर्ष रा.चंद्रसेननगर, भुईंज ता. वाई  (अटक)उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.


Back to top button
Don`t copy text!