
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई स्वप्नील मोरे यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये गहाळ झालेल्या मोबाईल फोनपैकी ५७ मोबाईल फोन शोधून फोनमालकांना परत दिले. ही कामगिरी सातारा जिल्ह्यात पोलीस दलातील सर्वोत्कृष्ट असल्याने सातारा शहर पोलीस ठाणे येथे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस शिपाई स्वप्निल मोरे यांना गौरविले.
यावेळी फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने प्रशस्तीपत्र पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी स्वीकारले.
