शिवाजीनगरमध्ये पोलीस नाईकाची राहत्या घरात आत्महत्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, पुणे, दि. २६: शहर पोलीस दलातील पोलीस नाईकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये घडली आहे. नाना हंडाळ (वय – 40) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना हंडाळ पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक पदावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. ते कुटुंबासह शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये डी इमारतीत राहत होते.

आज सायंकाळी त्यांचे कुटूंब बाहेर गेल्यानंतर रात्री साडेसहा ते पावणे सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या आत्महत्येने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

Back to top button
Don`t copy text!