दैनिक स्थैर्य | दि. १४ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहरात यापुढेही सर्व धर्माच्या नागरिकांनी शांतता व सलोखा राखावा. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत. त्यांना फॉरवर्ड किंवा लाईक करू नयेत, जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेनंतरही शहरात कोणताही अनुचित किंवा कायदा-सुव्यवस्थेला बांधा येईल, अशी घटना घडली नाही, त्याबद्दल कौतुक आहे. असाच शांतता व सलाखो यापुढेही राखून पोलिसांना व प्रशासनासह सहकार्य करावे, असे आवाहन फलटणचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी यांनी केले आहे.
फलटणला शांतता व सलोखा राहण्यासाठी शहरात विविध ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते.
तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे झालेल्या घटनेनंतर प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. आज इंटरनेट सेवा पुन्हा जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कालपासूनच फलटण शहरात पोलीस अधीक्षक राहुल धस यांनी विविध ठिकाणी बैठका घेऊन सर्व धर्माच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
यावेळी राहुल धस यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणार्या, टाकणार्या समाजकंटकांना इशारा देत पोलीस त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे सांगितले आहे. नागरिकांनीही अशा लोकांपासून दूर राहून अशा लोकांची सूचना जवळच्या पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन केले आहे.