PMC बँक घोटाळा : ED ची वीवा ग्रुपच्या 6 ठिकाणांवर छापेमारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.२२: पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव बँक (PMC Bank) घोटाळ्यातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने शुक्रवारी मुंबईच्या मीरा भायंदर, वसई-विरार परीसरात छापेमारी केली. ED ची टीम वीवा ग्रुपचे मालक आणि माजी आमदार हितेंद्र ठाकुर आणि जयेंद्र उर्फ भाई ठाकुर यांच्या 6 ठिकाणांवर छापेमारी केली. ED ला या प्रकरणात अटक झालेला प्रमुख आरोपी प्रवीण राउत आणि ठाकुर कुटुंबात मनी ट्रेल (पैशांची देवाण-घेणाव) चे पुराने मिळाले आहेत.

वीवा ग्रुप आणि याच्या समूह कंपन्या भाई ठाकुर यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडून चालवल्या जातात. भाई ठाकुर यांचा प्रभाव वसई-विरार या क्षेत्रात आहे. त्यांच्या विरोधात तस्करी, हत्या, जमिनीचा कब्जा आणि इतर अनेक प्रकरण दाखल आहेत. यातील काही प्रकरणांमध्ये त्यांना तुरुंगवासही झाला आहे. काही वर्षांपूर्वी ‘टाडा’ कायद्यांतर्गत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.

ठाकुर यांच्या पक्षाचे तीन आमदार

जयेंद्र उर्फ भाई ठाकुर यांचे भाऊ हितेंद्र ठाकुर बहुजन विकास अघाडी(बीवीए) नावाच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास अघाडीमधून राजेश रघुनाथ पाटील, क्षितिज ठाकुर आणि हितेंद्र ठाकुर आमदार झाले आहेत. क्षितिज ठाकुर भाई ठाकुर यांचे पुतणे आणि हितेंद्र ठाकुर यांचे पुत्र आहेत. वसई विरार महानगर पालिकेवरही भाई ठाकुर यांचे भाऊ हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास अघाडीची सत्ता आहे.

काय आहे PMC बँक घोटाळा ?

PMC बँकेत बनावटी खात्यांद्वारे एका डेव्हलपरला 6,500 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे रिजर्व बँकेच्या नजरेत आले होते. ही बाब 2019 मध्ये समोर आली होती. रिजर्व बँकेने सप्टेंबर 2019 मध्ये बँकेवर अनेक बंदी झातल्या होत्या. 23 सप्टेंबर 2019 पासून RBI चा मोरेटोरियम लागला आहे. या अंतर्गत बँकेच्या ठेवीदारांवर पैसे काढण्याचे निर्बेंद आहेत. RBI ने PMC बँकेच्या बोर्डाला भंग केले आहे.

या घोटाळ्यात अनेक सीनियर अधिकारी सामील होते. बँकेद्वारे रिअल एस्टेट कंपनी HDIL ला दिलेल्या कर्जाची RBI ला योग्य माहिती दिली नव्हती. या कर्जातही घोटाळ्याचे आरोप आहेत. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने HDIL चे प्रमुख सारंग वाधवान आणि राकेश वाधवानला अठक केले होते.


Back to top button
Don`t copy text!