दैनिक स्थैर्य | दि. १ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण, ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठाचीवाडी येथे २६ जानेवारी रोजी उद्यानकन्यांद्वारे १० वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये चिंच, वड, पिंपळ, निंब, करंज, बाभूळ इ. अशी झाडे लावण्यात आली. तसेच त्यांनी फुलझाडे लावून शाळेचे सुशोभीकरण वाढवले आणि शाळेतील विद्यार्थ्यांना वाढते प्रदूषण व त्यासाठी झाडांचे महत्त्व पटवून दिले.
हा उपक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री. तांबे सर व इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर आणि कृषी महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण अणि कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. पाटील सर आणि प्रा. जे. व्ही. लेंभे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या स्नेहल निकम, प्रज्ञा देशमुख, नम्रता ढोपरे, वैभवी रणवरे, गायत्री शेडगे, अस्मिता शिंदे यांनी परिश्रम घेतले.