दैनिक स्थैर्य | दि. २९ जुलै २०२४ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे, श्री जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज राजाळे येथे आज दि. २७ जुलै २०२४ रोजी शिक्षण सप्ताहानिमित्त वृक्षारोपण व स्नेहभोजन संपन्न झाले.
संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ संचलित ज्ञानेश्वर माऊली पायी वारी दिंडी राजाळे यांचेमार्फत प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना स्नेहभोजनाचे आयोजन प्रशालेत करण्यात आले.
या स्नेहभोजनासाठी मंडळाचे श्री. पोपटराव शेडगे, श्री. नामदेवराव ननवरे, श्री. किसनराव भोईटे, श्री. देवीदास मोरे गुरुजी, श्रीमती सुमन तोरशे, श्री. लालासाहेब शेडगे, श्री. शरद पवार, श्री. बबन सावंत यांनी नियोजन करून स्नेहभोजन दिले.
वरील सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.प्रशालेच्या प्राचार्या सौ. गायकवाड मॅडम व पर्यवेक्षिका श्रीमती काकडे मॅडम यांच्या हस्ते वरील सर्व प्रतिष्ठीत नागरिकांचा पुष्प, श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. निंबाळकर सर यांनी केले व आभार श्री. बाचल सर यांनी मानले.