दैनिक स्थैर्य | दि. १ एप्रिल २०२४ | फलटण |
फलटण तालुक्यामधील चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशूपालक यांना वैरण बियाणे वाटप करण्यात आलेले आहे. सदर बियाण्यामध्ये आफ्रिकन टॉल, सुधारित मका बियाणे, शुगरग्रेज आदी वैरण बियाणे वाटप करण्यात आले आहे.
फलटण तालुक्यासाठी एकूण २८५९७ किलो विविध बियाणे प्राप्त झालेले असून पशूवैद्यकीय संस्थांमार्फत सदर बियाणे वाटप करण्यात येत आहे. प्रथम टप्प्यामध्ये २०४१ लाभार्थींना बियाणे वाटप करण्यात आले असून पाण्याच्या उपलब्धतेनुसार पेरणी झालेली आहे. अंदाजे १२०५ हेक्टर पेरणी क्षेत्र असणार आहे आणि त्यापासून सुमारे ६०९०० मे. टन चारा उत्पादित होणार आहे. पशूपालक यांना आवाहन करण्यात येते की, पाण्याच्या उपलब्धतेनुसार वैरण बियाणे यांची लागवड करून चारा पिके घेण्यात यावीत आणि उपलब्ध झालेली वैरण यापासून मुरघास निर्मितीकडे लक्ष देवून चारा साठवणूक करण्यात यावी. जेणेकरून दुष्काळीसारख्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून दूध उत्पादनाचे सातत्य टिकवून ठेवता येईल.
वैरण बियाणे उपलब्धतेसाठी नजीकच्या पशूवैद्यकीय संस्था यांच्याशी संपर्क करावा.