दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२२ । सातारा । सातारा शहरामध्ये दि. 26 जून 2022 रोजी सकाळी 8.30 वा. समता दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. समता दिंडीचा प्रारंभ छत्रपती शाहू बोर्डींग, हाऊस शाखा नं. 2 येथून राजपथ मार्गे राजवाडा प्रतापसिंह हायस्कूल येथे समारोप होईल.
या दिंडीमध्ये सातारा शहरातील विविध विद्यालय-महाविद्यालयाती 600 ते 700 विद्यार्थी-विद्यर्थीनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेचे पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत.
तद्नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये शिष्यवृत्ती, जात पडताळणी प्रमाणपत्र व सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात आलेल्या आजी माजी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरती पोवाडा व व्याख्यानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे.