तिरंगा कॉलेजच्या विद्यार्थांना कोरोनाच्या काळात सुद्धा नामांकित कंपनीत प्लेसमेंट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २८ : तिरंगा कॉलेज ऑफ अनिमेशन अँड व्हीएफएक्स या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. याचे महत्वाचे कारण ऍनिमेशन हा कोर्स पूर्णपणे कौश्यल्य विकसित अश्या अभ्यासक्रमावरती आधारित असून ऍनिमेशन इंडस्ट्रीजला आवश्यक असणाऱ्या कौशल्याचं व व्यावसायिक गुणांचा सर्वांगीण विकास हा विविध प्रशिक्षण कार्यक्रम द्वारे सातत्याने तिरंगा कॉलेज मध्ये केला जात असतो. तिरंगा कॉलेज मध्ये ऍनिमेशन इंडस्ट्रीजचा अनुभव असलेल्या शिक्षकांमार्फत व विविध विषयातील तज्ज्ञांच्या लेक्चर द्वारे विद्यार्थ्यांना विकसित करण्यात येते.

तिरंगा फाउंडेशनचे अध्यक्ष व तिरंगा कॉलेजचे चेअरमन रणजित शिंदे यांनी यावेळी नमूद केले कि, ग्रामीण युवा विकासासाठी अ‍ॅनिमेशन हा उत्तम करिअरचा पर्याय आहे व सर्व विद्यार्थ्यांना उत्तम करिअर करता येते असे क्षेत्र आहे. पुढे असेही नमूद केले की ते नेहमी विध्यार्थी घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या सोईची नेहमी उपलब्धता करतात व विद्यार्थी विकास हा प्रथम स्थानी ठेवलेला असतो. तिरंगा फाउंडेशनच्या सचिव सौ. रजनी शिंदे यांनी मुलींसाठी विशेष कार्यक्रम राबविले आहेत. तिरंगा फाउंडेशनचे डायरेक्टर डॉ. पोपटराव मोहिते यांनी नमूद केले की, प्राचार्य रवी तिकटे व सर्व शिक्षक हे नेहमी विध्यार्थी विकासाला प्रथम प्राधान्य देत असतात.


Back to top button
Don`t copy text!