आरपीआयचे अध्यक्ष हरीश काकडे यांनी रेखाटलेले छायाचित्र श्रीमंत रामराजेंना भेट


स्थैर्य, फलटण : आरपीआय (आठवले गट) चे फलटण अध्यक्ष हरीश काकडे यांनी स्वतः विधान परिषदेचे सभापती व फलटणचे अधिपती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चित्र रेखाटून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना त्यांच्या फलटण येथील निवासस्थानावर भेट दिली आहे. सदरील छायाचित्र भेट दिल्यानंतर हरीश काकडे हे राजे गटात प्रवेश करणार आहेत कि काय ? अश्या चर्चा फलटणच्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

या वेळी माजी उपनगराष्यक्ष नितीन भोसले, माळजाई उद्यान समितीचे अध्यक्ष प्रतापसिंह निंबाळकर, बापूराव गावडे, मुकुंदराव रणवरे यांची उपस्थिती होती. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!