दैनिक स्थैर्य । दि. 02 ऑक्टोबर 2021 । फलटण । फलटण शहरामधील रिंगरोड वरील दुभाजक म्हणजेच डिव्हायडर बसवण्याचे काम फलटण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेले आहे. रिंगरोडवरून होणाऱ्या वाहतुकीसाठी अडचण येवू नये म्हणून रिंगरोड येथे उभारण्यात आलेल्या दुभाजकामध्ये विद्युत पोल बसवण्यात आलेले आहेत. सदरील विद्युत पोल मुळे फलटण शहराच्या रिंगरोड हा प्रकाशमय झालेला आहे. सदरील विद्युत पोलचे उद्घाटन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या वेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, मुख्याधिकारी संजय गायकवाड, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, किशोर नाईक निंबाळकर, सनी अहिवळे, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, नगरसेविका सौ. वैशाली अहिवळे, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. प्रगती कापसे, सौ. दीपाली निंबाळकर, अमित भोईटे, अमोल भोईटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.