
स्थैर्य, फलटण, दि.९: खेळामुळे व्यायाम होतो. यातून शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. आपल्या फलटणसारख्या तालुक्याच्या ठिकाणी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धा आयोजित करुन फलटणकरांसाठी अनोखी पर्वणी उपलब्ध करुन देण्याचा संयोजकांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. अशा स्पर्धांच्या आयोजनातून निश्चितपणे फलटणचे क्रिडा क्षेत्रातदेखील नाव आणखीन उंचावेल, असा विश्वास युवा नेते तथा माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला. दरम्यान; या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पोर्ट रिपब्लिक, पुणे या संघाचा पराभव करुन जीएसटी कस्टम्स, पुणे संघाने स्पर्धेचे विजेतेपदक पटकावले.
फलटण संस्थानचे युवराज तथा युवा नेते श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील मुधोजी क्लब मैदानावर आयोजित राज्यस्तरीय खुल्या बास्केट बॉल स्पर्धांचा पारितोषिक वितरण श्रीमंत अनिकेतराजे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, फलटण नगरपालिकेचे क्रिडा, शिक्षण, सांस्कृतिक समितीचे सभापती किशोरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक सनी अहिवळे, अजय माळवे, प्रा.भिमदेव बुरुंगले, दादासाहेब चोरमले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या फलटण परिसरात विविध खेळांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी आजवर यश संपादन केले आहे. संस्थानकाळापासून खेळाडूंना विशेष प्रोत्साहन देण्याची परंपरा आहे. क्रिकेट, खो-खो या खेळांबरोबरच बास्केट बॉल स्पर्धेतून या क्रीडा प्रकाराकडेही ग्रामीण भागातील अनेक खेळाडू आकर्षित होतील. स्पर्धा संयोजकांनी आयोजित केलेल्या या भव्य दिव्य संयोजनामुळे आपण भारावून गेल्याचे सांगत श्रीमंत अनिकेतराजे यांनी स्पर्धा संयोजकांचे विशेष कौतुक केले. तसेच हार व जीत हा खेळाचा अविभाज्य घटक असल्याचे सांगून विजयी संघाबरोबरच पराभूत संघांचेही स्पर्धेतील सहभागाबद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीस श्रीमंत अनिकेतराजे यांनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सदर राज्यस्तरीय बाकेस्ट बॉल स्पर्धेमध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यातून 24 संघ सहभागी झाले होते. प्रथम क्रमांकाचे रु.21 हजाराचे पारितोषिक जीएटी कस्टम्स, पुणे, द्वितीय क्रमांकाचे रु.15 हजाराचे पारितोषिक स्पोर्टस् रिपब्लिक, पुणे तर तृतीय क्रमांकाचे रु.11 हजाराचे पारितोषिक प्रिंस युनायटेड, कोल्हापूर या संघांनी पटकावले. स्पर्धेतील बेस्ट प्लेअर चा किताब रोहन जगताप याने तर बेस्ट शुटर चा किताब सिद्धांत शिंदे या खेळाडूला प्रदान करण्यात आला. यावेळी संयोजकांच्यावतीने श्रीमंत अनिकेतराजे यांच्या हस्ते केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
3 दिवस चाललेल्या या स्पर्धेस फलटणमधील क्रीडा रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी युथ बास्केटबॉल असोसिएशन, मुधोजी क्लब, फलटणचे प्रमुख तथा नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, मुधोजी क्लब फलटणचे सेक्रेटरी राजीव नाईक निंबाळकर, नितीनभैय्या भोसले, रणजीतभाऊ निंबाळकर, बाळासाहेब बाबर, दादासाहेब चोरमले, अनिल तेली, विजय जाधव, संजय फडतरे, मुन्ना शेख, जितु कदम, विजय लंगडे, नितीन घाटे यांच्यासह अतुल यादव, रोहन निकम, निलेश शहाणे, अजिंक्य सुर्यवंशी (बेडके), अमित मेघवानी, फारुक मुल्ला, संतोष परदेशी, जयेश जोशी, सागर मेघवानी, योगेश कापसे, नकुल तेली, भास्कर ढेकळे, राकेश तेली, विराज नाईक निंबाळकर, सागर कर्वे, अशोक मोरे, विकी मेघवानी, विवेक जाधव, गणेश अहिवळे, ओंकार परदेशी, अभिलाष मेनसे, पुनित दोशी, परेश मोदी, भूषण निकम, ओंकार भोईटे, संकेत कुंभार, आदित्य राशिनकर, योगेश तारू, वृषभ शहा, बंटी काळे, निरंजन सोनटक्के, सिद्धेश फणसे, संकेत भागवत, आदित्य ढेंबरे, तेजस मोहिते, अहमत शेख, ओम शिंदे, यश जाधव, साकीब बागवान आदींनी परिश्रम घेतले.