साताऱ्यात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या समितीवर फलटणचे अमर शेंडे यांची निवड


स्थैर्य, फलटण, दि. ५ ऑक्टोबर : साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ‘साहित्यिक व ऐतिहासिक दालन समिती’वर फलटण येथील अभ्यासक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह अमर शेंडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे फलटणच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

अमर शेंडे यांचा चरित्र लिखाणावर विशेष अभ्यास आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ तथा नाना शंकरशेट’ या चरित्राचा मुंबई विद्यापीठाने आपल्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह म्हणून कार्यरत असून, परिषदेच्या सर्व उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

साताऱ्यात होणाऱ्या आगामी साहित्य संमेलनासाठी संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ‘साहित्यिक व ऐतिहासिक दालन समिती’ जाहीर करण्यात आली आहे. या समितीची रचना खालीलप्रमाणे आहे:

मार्गदर्शक: विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत

मुख्य समन्वयक: जगदानंद भटकर

सदस्य: सचिन प्रभूणे, निलेश पंडित, श्रीनिवास वारुंजीकर, शेखर हसबनीस, रविंद झुटींग, जयंत देशपांडे, अमर शेंडे, संदिप डाकवे, अरूण जावळे


Back to top button
Don`t copy text!