फलटणकरांनी रणजितदादांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे : अ‍ॅड.जिजामाला नाईक निंबाळकर; “घड्याळ” चिन्ह लक्षात ठेवा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि.‌ १३ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘गेल्या 25 वर्षात जेव्हढा फलटणचा विकास झाला नाही तेव्हढा गेल्या 5 वर्षात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात झाला आहे. फलटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता अशा सगळ्याच अद्ययावत सुविधा मिळवण्यासाठी, लोकसभा निवडणूकीप्रमाणे आत्ताही फलटणकरांनी रणजितदादांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून सचिन पाटील यांना घड्याळ या चिन्हावर मतदान करत भरघोस मतांनी विजयी करावे’’, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अ‍ॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ अ‍ॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील रविवार पेठ, गजानन चौक, राजमाता अहिल्यादेवी नगर, मलटण आदी भागात मतदारांच्या घरोघरी जावून प्रत्यक्ष भेटी घेतल्या. त्यादरम्यान मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांचेसमवेत महायुतीच्या घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचारादरम्यान व्यापारी, नोकरदार, गृहिणी, युवा अशा सर्वच मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधताना मतदारांकडून ठिकठिकाणी अ‍ॅड.जिजामाला नाईक निंबाळकर यांचे स्वागत होताना दिसत असून, ‘‘ केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यास राज्याची प्रगती गतीने होत असते. तसेच महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, युवा यांच्यासाठी सरकारने सुरु केलेल्या योजना अविरत सुरु ठेवण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान करताना आपल्या भवितव्याचाही विचार मतदारांनी जागृतपणे करावा’’, असेही आवाहन अ‍ॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर मतदारांना करीत आहेत.

‘‘माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या पाच वर्षाच्या खासदारपदाच्या कारकीर्दीत रेल्वे, रस्ते, पाणी यासाठी कोट्यावधीचा निधी आणून ही सर्व कामे प्रत्यक्षात उतरवल्याचे सर्वांनी पाहिले आहे. मतदारांनी लोकसभा निवडणूकीवेळी ज्याप्रमाणे रणजितदादांना मताधिक्य दिले तोच विश्‍वास कायम ठेवून सचिन पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करावे’’, असेही आवाहन अ‍ॅड.सौ.जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!