फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व, तर पंचायत समितीत सत्तेचा ‘टाय’! विजयी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर


सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समिती निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर. जिल्हा परिषदेच्या ८ पैकी ५ जागांवर शिवसेनेचा (राजे गट) विजय. पंचायत समितीत ८-८ ने बरोबरी. वाचा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी आणि पक्षनिहाय बलाबल…

स्थैर्य, फलटण, दि. १० फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे (Satara ZP & Phaltan PS Election 2026) अंतिम निकाल जाहीर झाले असून, फलटण तालुक्यात राजे गटाने (शिवसेना) जोरदार मुसंडी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ८ गटांपैकी ५ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तर भाजपला २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागेवर विजय मिळाला आहे.

दुसरीकडे, फलटण पंचायत समितीमध्ये (Phaltan Panchayat Samiti) मात्र अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. येथे शिवसेनेचे (राजे गट) ८ उमेदवार आणि महायुतीचे (भाजप+राष्ट्रवादी) ८ उमेदवार निवडून आल्याने १६ जागांचे समीकरण ८ विरुद्ध ८ असे समसमान झाले आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सत्तेचा फैसला आता चिठ्ठीवर किंवा पुढील रणनीतीवर अवलंबून असणार आहे.

या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी कोळकी गटातून सह्याद्री कदम (शिवसेना), तर वाठार निंबाळकर गटातून विष्णू लोखंडे (भाजप) यांनी दणदणीत विजय मिळवला.

फलटण तालुका: जिल्हा परिषद व पंचायत समिती विजयी उमेदवार यादी

खालील तक्त्यामध्ये गट आणि गणनिहाय विजयी उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष देण्यात आला आहे:

१. जिल्हा परिषद गट (Zilla Parishad Gat)

अ. क्र. जिल्हा परिषद गटाचे नाव विजयी उमेदवाराचे नाव पक्ष / आघाडी
तरडगाव

गिरीश सुदाम बनकर

शिवसेना 

साखरवाडी – पिंपळवाडी

रुपाली लक्ष्मण सरगर

शिवसेना 

विडणी

ज्योती गौतम मोरे

शिवसेना

गुणवरे

ऋतुजा अभिजीत जगताप

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

बरड

कांबळे वैशाली संदिप

शिवसेना

कोळकी

सह्याद्री सुर्याजीराव उर्फ चिमणराव कदम

शिवसेना

वाठार निंबाळकर

विष्णू किसन लोखंडे

भारतीय जनता पार्टी

हिंगणगाव

किरण निलेश नलवडे

भारतीय जनता पार्टी

२. पंचायत समिती गण (Panchayat Samiti Gana)

अ. क्र. पंचायत समिती गणाचे नाव विजयी उमेदवाराचे नाव पक्ष / आघाडी
पाडेगाव

राहुल दादासो नरूटे

शिवसेना

तरडगाव

योगिता दिपक गायकवाड

शिवसेना

साखरवाडी – पिंपळवाडी

शिवांजली विक्रमसिंह भोसले

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

सस्तेवाडी

तांबे गणेश मल्हारी

शिवसेना

सांगवी

पुष्पा रामचंद्र चोपडे

शिवसेना

विडणी

सचिन गजानन अभंग

भारतीय जनता पार्टी

गुणवरे

वनिता धनाजी आढाव

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

आसू

संजय रघुनाथ पवार

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

बरड

आटोळे स्वाती हणमंत

शिवसेना

१० दुधेबावी

सौ. विजया हनुमंत सोनवलकर

शिवसेना

११ कोळकी

विकास अशोक नाळे

भारतीय जनता पार्टी

१२ जाधववाडी (फ)

अमोल दशरथ सस्ते

शिवसेना

१३ वाठार निंबाळकर

शुभांगी तुकाराम शिंदे

भारतीय जनता पार्टी

१४ सुरवडी

धनंजय प्रल्हादराव साळुंखे

भारतीय जनता पार्टी

१५ सासवड

संतोष अंकुश कारंडे

शिवसेना

१६ हिंगणगाव

सौ. सिमा सुरेश भोईटे

भारतीय जनता पार्टी

पक्षनिहाय अंतिम बलाबल:

  • जिल्हा परिषद (एकूण ८): शिवसेना – ५, भाजप – २, राष्ट्रवादी – १.

  • पंचायत समिती (एकूण १६): शिवसेना – ८, भाजप – ५, राष्ट्रवादी – ३ (महायुती एकूण ८).


Back to top button
Don`t copy text!