दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । फलटण । सध्या जगामध्ये सर्वात महत्वाचा असलेला विषय म्हणजे रशिया व युक्रेनचे युद्ध. यामध्ये भारतामधील विद्यार्थी व नागरिक यांना सुखरूप रित्या मायदेशी आणण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु आहे. फलटणचा अतुल प्रकाश नायर हा विद्यार्थी युक्रेन येथे शिक्षण घेत होता. युद्ध परिस्थिती वाढत असल्याने त्याला फलटणमध्ये पुन्हा आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले. त्याबद्दल अतुल प्रकाश नायर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानले. अतुल प्रकाश नायर हा विद्यार्थी फलटण येथे सुखरूप पोह्चल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने अतुल प्रकाश नयेत याचा त्याच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, भाजपा शहराध्यक्ष अमोल सस्ते, राजेश शिंदे यांच्यासह फलटण येथील नायर परिवार उपस्थित होते.
यावेळी अतुल नायर यांनी युक्रेन येथील सद्य परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. जगातील इतर देशांनी आपापल्या देशातील मुलांना कसलीही मदत केली नाही. परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार सातत्याने लक्ष घालून आपल्या देशातील मुलांना आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. भारताचे युक्रेन येथील राजदूत खूप मेहनत घेत आहेत.