प्रभाग १२ मध्ये राजे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला भाजपचा झेंडा


फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये राजे गटाला मोठा धक्का बसला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. वाचा सविस्तर.

स्थैर्य, फलटण, दि. 03 डिसेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजे गटाला गळती लागली असून, प्रभाग क्रमांक १२ मध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राजे गटाला रामराम ठोकत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे प्रभाग १२ मधील भाजपचे उमेदवार अरुण खरात यांची बाजू भक्कम झाली आहे.

युवकांचा भाजपला वाढता पाठिंबा

या प्रवेश सोहळ्यासाठी सद्गुरू समूहाचे शिल्पकार आणि सद्गुरू पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले तसेच प्रभाग क्रमांक १२ चे भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण खरात प्रमुख उपस्थित होते. फलटण शहरात सध्या भाजपमध्ये ‘इनकमिंग’ सुरू असून, विशेषतः तरुण वर्गाचा ओढा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुतीकडे वाढताना दिसत आहे.

राजे गटाची ताकद घटली?

प्रभाग १२ हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. या प्रभागातील प्रमुख आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी राजे गटाची साथ सोडल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्षात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले आणि शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

यावेळी त्रिमूर्ती नवरात्र उत्सव मंडळाचे सागर मोहिते, रामभाऊ देशमाने, अशू देशमाने, निलेश लाळगे, प्रज्वल मोहिते, विक्रम भोसले, अमित वरे, हृषीकेश मोहिते, यश ढावरे, किरण चव्हाण, प्रज्वल घाडगे, संजय गुरखा, यश पाटोळे, भावेश रायते, ओंकार घाडगे, धीरज काळे, प्रणव यादव, उमेश पिसे, सुरज सपकाळ, सुरज सपकाळ, अशोक जाधव, प्रमोद यमपुरे, राकेश लाळगे, सुरज काळे, सतीश क्षीरसागर, करडे, गणेश पिसे, गौरव देशमाने, अनुराग देशमाने, मंगेश लाळगे, अनिकेत घाडगे, अश्विन देशमाने, अभिजित देशमाने, दत्तू लाळगे यांच्यासह शेकडो युवा कार्यकर्त्यानी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.


Back to top button
Don`t copy text!