दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटण यांच्यातर्फे अकलकोट निवासी सद्गुरू श्री अकलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या अमृत कृपाद़ृष्टी आशिर्वादाने फलटण ते श्री क्षेत्र अकलकोट पायी वारी पालखी सोहळा गुरुवार, दि. १६ नोव्हेंबर २०२३ ते रविवार, दि. २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत साजरा होत आहे.
गुरुवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी रथ व पालखी पूजनाचा कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता होऊन रथ प्रस्थान होऊन गजानन चौक ते एस. टी स्टँण्डमार्गे अकलकोटकडे मार्गस्थ होईल. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यााठी सकाळी ७.३० वाजता श्री स्वामी समर्थ मंदिरात हजर रहावे, असे आवाहन श्री स्वामी समथृ सेवा मंडळ फलटण यांच्याकडून करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. दीपक पखाले – ७०२०८६०४२९, श्री. धनंजय पवार – ९२८४४६६७८२ व श्री. संकेत चोरमले – ७०६६८८७९०८.
या पायी वारी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
- गुरुवार, दि. १६ नोव्हेंबर – सकाळचा नाष्टा (श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ), दुपारचे जेवण (श्री. दत्तात्रय बापूराव बिचुकले, विडणी), रात्रीचे जेवण (श्री. संजय हणमंत गायकवाड), मुकाम वाजेगाव.
- शुक्रवार, दि. १७ नोव्हेंबर – सकाळचा नाष्टा (श्री. महेश रामचंद्र लोंढे, बरड व श्री. संतोष विलास गावडे, राजुरी), दुपारचे जेवण (श्री. विजय तुळशीराम घोरपडे, श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय धर्मपुरी), रात्रीचे जेवण (श्री. बबनराव मारूती वणवे), मुकाम नातेपुते.
- शनिवार, दि. १८ नोव्हेंबर – सकाळचा नाष्टा (श्री. किशोर मधुकर दगडे, मांडवे फाटा), दुपारचे जेवण (रूपाली विनायक काकडे, शिवामृत मंगल कार्यालय, सदाशिवनगर), रात्रीचे जेवण (श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ), मुकाम माळशिरस.
- रविवार, दि. १९ नोव्हेंबर – सकाळचा नाष्टा (श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, खुडूस), दुपारचे जेवण (श्री. आनंद बाळासोा जाधव, खुडूस व सद्गुरू हॉटेल, पिसेवस्ती), रात्रीचे जेवण (श्री. दादासो एकनाथ जाधव व डॉ. हणमंत बुवासो फाळके), मुकाम जाधववस्ती, तोंडले.
- सोमवार, दि. २० नोव्हेंबर – सकाळचा नाष्टा (श्री. सत्यवान काळे सर, वाडी किरोली व श्री. अमरसिंह अशोकराव देशमुख), दुपारचे जेवण (श्री. भास्कर केरबा भोईटे, वाखरी), रात्रीचे जेवण (श्री. राजेंद्र सुखदेव माने), मुकाम पंढरपूर.
- मंगळवार, दि. २१ नोव्हेंबर – सकाळचा नाष्टा (कै. सीताराम जगदेवराव निंबाळकर यांच्या स्मरणार्थ श्री. मनिष सीताराम निंबाळकर, पंढरपूर), दुपारचे जेवण (श्री. संभाजी विनायक डुबल, आंजनसोंड डुबलवस्ती), रात्रीचे जेवण (श्री. चिन्मय दिलीपराव घाडगे), मुकाम सुस्ते.
- बुधवार, दि. २२ नोव्हेंबर – सकाळचा नाष्टा (श्री. त्रिंबक कृष्णा बनसोडे, फाटा नं. ४८ व श्री. दिनकर काशिद, वरकुटे काशिदवाडी), दुपारचे जेवण (श्री. महेश विलास बसाटे, शेजबाभळ वरकुटे), रात्रीचे जेवण (श्री. प्रदीप वसंतराव काटकर, कुरूल), मुकाम कुरूल.
- गुरुवार, दि. २३ नोव्हेंबर – सकाळचा नाष्टा (श्री. सदाशिव नारायण कांबळे (पेट्रोल पंप व श्री. राजेंद्र संदीपान शिंदे, कामथी), दुपारचे जेवण (श्री. नागनाथ पंढरीनाथ गवळी, तिर्हे), रात्रीचे जेवण (संस्कृती मंगल कार्यालय व श्री. संदीप पोपट मदने सर), मुकाम बेलाटी देगाव.
- शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर – सकाळचा नाष्टा (श्री. मोहनलाल गणेशराम परदेशी, देगाव), दुपारचे जेवण (श्री. सुनील मारूतराव चोरमले, सोलापूर व विठ्ठल मंदिर, चौपाडा), रात्रीचे जेवण (श्री. गेणसिध्दनाथ देवस्थान मंदिर व श्री. गेणाप्पा गुंडे), मुकाम कुंभारी.
- शनिवार, दि. २५ नोव्हेंबर – सकाळचा नाष्टा (बोंदाडे पेट्रोल पंप, दुधगी व अदिती महेश कदम), दुपारचे जेवण (श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, वळसंग व श्री. अशोक सर्जेराव पवार), रात्रीचे जेवण (श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम व श्री. अभिजित रामराव बोबडे), मुकाम ब्यागेहळ्ळी फाटा.
- रविवार, दि. २६ नोव्हेंबर – सकाळचा नाष्टा (पेट्रोल पंप, अकलकोट व श्री. सुशांत बापूसाहेब निंबाळकर), दुपारचे जेवण (खंडोबा मंदिर, समाधी मठ व श्री वटवृक्ष मंदिर, अन्नछत्र मंडळ, अकलकोट), फलटणकडे प्रस्थान.