अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी फलटण ते पुणे डेमू रेल्वे सेवा सुरू होणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २८ : रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील लोकांच्या सोयीसाठी फलटण ते पुणे आणि परती साठी डेमु रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फलटण-पुणे दरम्यान अनारक्षित डब्यांची ही नियमित डेमू सेवा मंगळवार 31 मार्च पासून सुरू होईल. तत्पूर्वी सोमवारी 30 मार्च रोजी याच मार्गावर उद्घाटन विशेष गाडी चालविण्यात येणार असून या विशेष गाडीचे उद्घाटन माननीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते व्हिडिओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवून फलटण स्टेशन येथून गाडी रवाना केली जाईल. ही गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी आणि सासवड रोड स्टेशनवर थांबेल.

अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी फलटण – पुणे अनारक्षित डेमु गाडीची नियमित सेवा मंगळवार 31 मार्चपासून सुरू होईल. गाडी क्रमांक 01435 पुणे येथून 05.50 वाजता सुटेल व 09.35 वाजता फलटणला पोहोचेल व परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01436 फलटण येथून 18.00 वाजता सुटेल व पुणे येथे 21.35 वाजता पोहोचेल. ही गाडी सुरवडी, लोणंद, नीरा, जेजुरी व सासवड रोड स्टेशनवर थांबेल. रविवारी ही सेवा बंद राहील.

राज्य शासनाने स्थानिक प्रशासकीय स्तरावर अत्यावश्यक सेवेतील संबंधित लोकांना फलटणचे प्रांत अधिकारी यांच्याकडून क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे / पास दिले जातील व पुणे पोलिस आयुक्त यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. जे संपूर्ण प्रक्रिया पुर्ण करून क्यूआर कोड आधारित ओळखपत्रे / पास जारी करतील. प्रांत अधिकारी फलटण व पोलीस आयुक्त पुणे अत्यावश्यक सेवेतील लोकांची ओळख पटवून त्यांना ओळख पत्र जारी करतील ही ओळखपत्रे क्यू आर कोड आधारित/ पास आधारित असतील. अत्यावश्यक सेवेतील लोक स्टेशन वर क्यू आर कोड आधारित ओळखपत्र / पास दाखवून तिकीट खरेदी करून प्रवास करू शकतात.


Back to top button
Don`t copy text!