
दैनिक स्थैर्य | दि. 04 सप्टेंबर 2024 | फलटण | फलटण ते बारामती रस्त्याचे कामकाज हे अंतिम टप्प्यात आले असून यामध्ये अनेक अडीअडचणी आल्या होत्या. त्यामध्ये प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी पुढाकार घेत स्थानिक पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक राजकारणी यांच्याशी समन्वय साधत सदरील रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे निर्देश प्रांताधिकारी ढोले यांनी दिले आहेत.
याबाबत अधिक बोलताना प्रांताधिकारी ढोले म्हणाले की; रस्त्याच्या मध्यभागी चांगल्या दर्जाची झाडे लावून रस्ता सुशोभित करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या एक महिन्यात काम पुर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. यामध्ये जो रस्ता अपूर्ण राहिला होता; तो पूर्णत्वास जाण्यासाठी सर्वांच्या समन्वयातून तो पूर्णत्वास जाणार आहे.