दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण शहरासह तालुक्यातील सर्व नागरिकांची मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. याचा शुभारंभ हा फलटण शहरातून करण्यात आला असून जिल्हा परिषद, पंचायत समिती गणनिहाय सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. शहरासह तालुक्यातील कोणताही नागरिक वंचित राहू नये याची काळजी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घेण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
मलठण येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी माजी खासदार रणजितसिंह बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम, युवा नेते रणवीर समशेरसिंह नाईक निंबाळकर, भाजपा फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भाजपा शहराध्यक्ष अनुप शहा, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, अजय माळवे, सुधीर अहिवळे, माजी नगरसेविका सौ. मंगलादेवी नाईक निंबाळकर, सौ. मीना नेवासे, सौ. मदालसा कुंभार यांच्यासह मलठण परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना नरसिंह निकम म्हणाले कि; माजी खासदार रणजितसिंह यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार रणजितसिंह यांच्या मनामध्ये सर्वप्रथम विचार हा मलठणचाच येतो. आगामी विधानसभा निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायचे आहे. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने विविध योजना आणल्या आहेत. गत 50 वर्षात एवढ्या योजना नव्हत्या तेवढ्या योजना ह्या भारतीय जनता पार्टीने आणल्या आहेत. गरिबांच्या घरात पैसे जात आहे हे विरोधकांच्या पोटात दुःखत आहे. पुन्हा भारतीय जनता पार्टीचे हे सरकार आणायचे आहे. माजी खासदार रणजितसिंह यांच्यासोबत तरुण कार्यकर्ता मोठ्या प्रमाणावर आहे. आणि तो माजी खासदार रणजितसिंह यांच्यासोबत प्रामाणिक आहे. जो प्रामाणिक नाही त्याला माजी खासदार रणजितसिंह यांनी थारा दिला नाही आणि देणार सुद्धा नाही.
यावेळी बोलताना भाजपा फलटण विधानसभा प्रमुख सचिन कांबळे म्हणाले कि; माजी खासदार रणजितसिंह यांच्या माध्यमातून फलटण शहरामध्ये विविध ठिकाणी मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित घेण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे. गत 30 वर्षात रखडलेला विकास रणजितसिंह खासदार झाल्यावर त्यांनी मार्गी लावला आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रत्येक घरात नव्हे तर घरातील प्रत्येकासाठी विविध योजना आहेत. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे गोर गरिबांचे सरकार आहे.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक अशोकराव जाधव म्हणाले कि; भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत चष्मे तपासणी व वाटप माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून राबविले जात आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यात मोफत सायकल, मोफत भांडी किट, लाडकी बहिण योजना यासह विविध योजना राबवल्या आहेत. माजी खासदार रणजितसिंह यांनी मलठणमध्ये विकासकामे मार्गी लावली आहे. मलठणमध्ये विकासगांगा कायम वाहत राहणार आहे.