दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे नेते ना. अजित पवार यांची फलटण तालुका संविधान समर्थन समितीच्या वतीने सोमवारी भेट घेण्यात आली. या भेटीत राज्यातील बौद्ध समाजावर गेल्या १५ वर्षांपासून राजकीय अन्याय झाला असून यंदा राष्ट्रवादी पक्षातर्फे बौद्ध समाजाला फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून संधी द्यावी, अशी मागणी बहुजन योद्धा विजय येवले यांनी अजित पवार यांच्याकडे केली. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी ना. पवार यांना यावेळी सुपूर्द केले.
यावेळी ना. अजित पवार यांनी येवले यांना विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील पक्षांची जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू आपल्या पक्षाला फलटण तालुक्यातील जागा मिळाल्यास आपल्या समाजाच्या उमेदवारीचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
निवेदन देताना संविधान समर्थन समितीचे सदस्य व माजी नगर सेवक सचिन अहिवळे, सनी काकडे, शक्ती भोसले, संग्राम अहिवळे, महादेव गायकवाड, दया पडकर, संजय गायकवाड, रोहित माने, सूरज अहिवळे, बंटी साबळे, सागर अहिवळे, साईनाथ भोसले, वैभव काकडे हे उपस्थित होते.