फलटण तालुका साखर कामगार युनियनकडून उद्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
श्री दत्त इंडिया प्रा.लि. कारखान्याची २०१९ पासूनची यशस्वी वाटचाल व घोडदौड सुरू ठेवून परिसरातील शेतकरी व कामगार यांना न्याय देऊन नवचैतन्य निर्माण केले. तसेच कामगारांच्या विविध प्रश्नांवर मार्ग काढून मोलाचे सहकार्य करणारे विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रीती रूपारेल, संचालक जितेंद्रकुमार धारू व महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रविवार, दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता श्री गणपती मंडप, साखरवाडी येथे होणार आहे.

या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका साखर कामगार युनियन, श्री दत्त इंडिया प्रा.लि. साखरवाडी, श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. फलटण युनिटचे सर्व अधिकारी व कामगारांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!