फलटण तालुका मेडिकल असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा श्रीमंत रामराजेंच्या हस्ते सत्कार


दैनिक स्थैर्य | दि. २६ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण तालुका मेडिकल असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीमंत रामराजेंनी नूतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. दीपक चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फलटण तालुका मेडिकल असोसिएशनची नूतन कार्यकारिणी अशी : संग्रामसिंह नरेंद्र धुमाळ – अध्यक्ष, नंदकुमार गावडे – उपाध्यक्ष ग्रामीण, रणजित काशिनाथ कदम – उपाध्यक्ष शहर, संजयकुमार जसवंतलाल शाह – सचिव, विक्रम घाडगे – खजिनदार, प्रणव प्रभाकर मंत्री – सहसचिव, श्रीकृष्ण सातव – संघटक सचिव, कार्यकारिणी सदस्य – ओंकार भोसले, दिनेश अब्दागिरे, ज्ञानराज पोरे, विश्वराज गांधी, अशोक गेजगे, सुजित भोईटे.

फलटण तालुका मेडिकल असोसिएशनचे नूतन कार्यकारिणीचा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याची माहिती तालुका संघटनेचे जेष्ठ सभासद विजय जाधव यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!