
फलटण तालुक्यातील १३१ पैकी १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या मार्गावर आहे. प्रभाग रचनेचे आदेश प्राप्त झाले असून, साखरवाडी, कोळकी, तरडगावसह प्रमुख गावांत ‘खासदार गट विरुद्ध राजे गट’ असा सामना रंगणार आहे. वाचा सर्व १०२ गावांची यादी.
स्थैर्य, फलटण, दि. १९ फेब्रुवारी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा शांत होतोय न होतोय, तोच फलटण तालुक्याच्या ग्रामीण राजकारणात पुन्हा एकदा एका मोठ्या ‘महासंग्रामाची’ ठिणगी पडली आहे. फलटण तालुक्यातील एकूण १३१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार आहे.
शासनाकडून ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे अधिकृत आदेश प्रशासनाला प्राप्त झाले असून, येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा ‘खासदार गट’ (रणजितसिंह नाईक निंबाळकर) विरुद्ध ‘राजे गट’ (रामराजे नाईक निंबाळकर) असा सत्तेचा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे.
तालुक्यातील बहुतांश मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावांचा या निवडणुकीत समावेश आहे. यामध्ये माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच यापूर्वी मुदत संपून प्रशासकराज असलेल्या गावांचा समावेश आहे. ‘थेट सरपंच’ निवडीमुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, गावागावांत आतापासूनच मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
‘या’ १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आखाडा तापणार (कंसात मुदत समाप्तीची तारीख):
२२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती:
साखरवाडी (२२/०२/२०२६), तांबवे (२२/०२/२०२६), कोळकी (२२/०२/२०२६), पिराचीवाडी (२२/०२/२०२६), खुंटे (२२/०२/२०२६), भिलकटी (२२/०२/२०२६), जाधववाडी (फ) (२२/०२/२०२६), अलगुडेवाडी (२२/०२/२०२६), सोनवडी खु. (२२/०२/२०२६), तिरकवाडी (२२/०२/२०२६), सासकल (२२/०२/२०२६), डोंबाळवाडी (२२/०२/२०२६), शेरेशिंदेवाडी (२२/०२/२०२६), सस्तेवाडी (२२/०२/२०२६), घाडगेवाडी (२२/०२/२०२६), कापडगाव (२२/०२/२०२६), निरगुडी (२२/०२/२०२६), रावडी बु. (२२/०२/२०२६), वाघोषी (२२/०२/२०२६), जिती (२२/०२/२०२६), कापशी (२२/०२/२०२६), धुमाळवाडी (२२/०२/२०२६), मुळीकवाडी (२२/०२/२०२६), काशिदवाडी (२२/०२/२०२६), फरांदवाडी (२२/०२/२०२६), घाडगेमळा (२२/०२/२०२६), कुरवली बु. (२२/०२/२०२६), शिंदे नगर (२२/०२/२०२६), ठाकुरकी (२२/०२/२०२६), नांदल (२२/०२/२०२६), सरडे (२२/०२/२०२६), सांगवी (२२/०२/२०२६), राजुरी (२२/०२/२०२६), तावडी (२२/०२/२०२६), जावली (२२/०२/२०२६), खामगाव (२२/०२/२०२६), हिंगणगाव (२२/०२/२०२६), मुंजवडी (२२/०२/२०२६), साठे (२२/०२/२०२६), खराडेवाडी (२२/०२/२०२६).
२३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती:
मलवडी (२३/०२/२०२६), तडवळे (२३/०२/२०२६), विचुर्णी (२३/०२/२०२६), वडगाव (२३/०२/२०२६), निंबळक (२३/०२/२०२६), मिरढे (२३/०२/२०२६), कोरेगाव (२३/०२/२०२६), मुरुम (२३/०२/२०२६), शेरेचीवाडी ढ. (२३/०२/२०२६), भाडळी बु. (२३/०२/२०२६), भाडळी खु. (२३/०२/२०२६), टाकळवाडे (२३/०२/२०२६), ढवळ (२३/०२/२०२६), आंदरूड (२३/०२/२०२६), रावडी खु. (२३/०२/२०२६), आरडगाव (२३/०२/२०२६), शिंदेवाडी (२३/०२/२०२६), नाईकबोमवाडी (२३/०२/२०२६), कांबळेश्वर (२३/०२/२०२६), धुळदेव (२३/०२/२०२६), निंभोरे (२३/०२/२०२६), काळज (२३/०२/२०२६), बीबी (२३/०२/२०२६), हणमंतवाडी (२३/०२/२०२६), बोडकेवाडी (२३/०२/२०२६), होळ (२३/०२/२०२६), सोनगाव (२३/०२/२०२६), वडजल (२३/०२/२०२६), फडतरवाडी (२३/०२/२०२६), आळजापूर (२३/०२/२०२६), राजाळे (२३/०२/२०२६), गुणवरे (२३/०२/२०२६), वाखरी (२३/०२/२०२६), सोनवडी बु. (२३/०२/२०२६), ढवळेवाडी नि. (२३/०२/२०२६), झिरपवाडी (२३/०२/२०२६), पवारवाडी (२३/०२/२०२६), शेरेचीवाडी (हिं) (२३/०२/२०२६), को-हाळे (२३/०२/२०२६), जाधववाडी (ता.) (२३/०२/२०२६).
प्रशासक असलेल्या व मुदत संपलेल्या ग्रामपंचायती:
तरडगाव (१८ मार्च २०२४), खडकी (१९ मार्च २०२४), गोखळी (१९ मार्च २०२४), माळेवाडी (१९ मार्च २०२४), चांभारवाडी (२२ मार्च २०२४), दालवडी (२३ मार्च २०२४), विठ्ठलवाडी (२३ मार्च २०२४), शिंदेमाळ (२४ मार्च २०२४), सासवड (२४ मार्च २०२४), टाकोबाईचीवाडी (२६ मार्च २०२४), ढवळेवाडी (आसू) (२७ मार्च २०२४), मिरगाव (२७ मार्च २०२४), मि-याचीवाडी (दा.) (२९ मार्च २०२४), आसू (०२ एप्रिल २०२४), खटकेवस्ती (११ मे २०२४), ऊळुंब (०३ डिसेंबर २०२४), माझेरी (०१ जानेवारी २०२५), गोळेवाडी (०३ जानेवारी २०२५), परहर खु. (७ जानेवारी २०२५), जोर पुन. (वाखरी) (१४ फेब्रुवारी २०२५), गोळेगाव पु. (ठाकुरकी) (२३ फेब्रुवारी २०२५), जोर पुन. (कुरवली खु) (२६ फेब्रुवारी २०२५).
पुन्हा एकदा ‘हायव्होल्टेज’ ड्रामा
या निवडणुकांमध्ये कोळकी, साखरवाडी, गुणवरे, तरडगाव, आसू, होळ यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने तालुक्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. दोन्ही गटांसाठी या ग्रामपंचायती ताब्यात ठेवणे प्रतिष्ठेचे ठरणार आहे.

