
दैनिक स्थैर्य | दि. 02 ऑगस्ट 2024 | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण येथे वयोश्री योजनेचे फॉर्म भरण्याची सोय ही माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केली होती. त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये एका दिवसात तब्बल 150 ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री योजनेसाठी अर्ज अनुप शहा यांच्या कार्यालयात दाखल केले आहेत.
– नक्की काय आहे वयोश्री योजना –
65 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या माध्यमातून प्रतीमहिना 3 हजार रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सदरील योजना सुरू केली आहे.