दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । फलटण । एसटी स्थानकामधील प्रलंबित काम 15 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी कालावधीत एस. टी. स्थानकामध्ये सुधारणा होणार का अशी चर्चा प्रवासी आणि कर्मचार्यांमधून होत आहे.
गेल्या अनेक वर्ष एसटी स्थानकाचे चे काम प्रलंबित असल्याने प्रवाशांना होत असलेला गैरसोयीचा आढावा त्यांनी एसटी स्टँडवर जाऊन घेतला यावेळी सातारा जिल्हा परिवहन विभागाचे प्रमुख पलंगे यांच्यासह एसटी कर्मचारी प्रवासी उपस्थित होते.
यावेळी संबंधित सिनर्जी स्काय इन्फ्रा डेव्हलपमेंट या कंपनीला फलटण येथील बसस्थानक नुतनीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामाचे कार्यादेश पत्र क्र. 1168 दि. 24.05.2019 रोजी देण्यात आलेला होता. सदरचे काम कार्यादेश निघालेपासून तातडीने पुर्ण करणे बाबा संबंधित कंपनीला वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतु हे काम सुरु करणेत येवून वेळोवेळी काहीतरी कारणे देवून काम प्रलंबित ठेवले गेले या दिरंगाईमुळे विदयार्थी, प्रवाशी व राज्य परिवहन कर्मचारी यांना अतोनात त्रास सहन करावे लागत असल्याचे सातारा एसटीचे विभागीय नियंत्रक पलंगे यांनी सांगितले.