दैनिक स्थैर्य | दि. १७ एप्रिल २०२४ | फलटण |
महिला अत्याचार व खुनासारख्या गुन्ह्यात फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी साक्षीदारांना संरक्षण देऊन व पुरावे मांडणी करून दोन शिक्षा देण्याकामी या वर्षात कामगिरी केली आहे. तसेच प्रथम वर्ग न्यायालयात चालणार्या खटल्यातसुद्धा या वर्षात शिक्षा देण्याबाबत कार्यवाही केली आहे.
या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलिस आँचल दलाल यांनी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, साधना कदम, नेवासे यांचा क्राईम मिटींगमध्ये सत्कार केला. त्यावेळी फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस उपस्थित होते.