दैनिक स्थैर्य | दि. १२ जून २०२३ | फलटण |
कोल्हापूर येथे झालेल्या जातीय दंगलीच्या अनुषंगाने फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा ‘रूट मार्च’ काढण्यात आला.
फलटण शहरातून गजानन चौक – श्रीराम मंदिर – शंकर मार्केट- गणपती मंदिर – उमरेश्वर चौक – मलठण मज्जिद – पाचबती चौक -आखरी रस्ता – टेंगूळ चौक -बारामती चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक -डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक – महावीर स्तंभ चौक- गजानन चौक – महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालय असा हा ‘रूट मार्च’ काढण्यात आला.
या ‘रूट मार्च’मध्ये फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, चार अधिकारी, २४ अंमलदार, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, तीन अधिकारी, १९ अंमलदार, लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, १ अधिकारी, ५ अंमलदार व पोलीस मुख्यालयाकडील १५ अंमलदार असे फलटण उपविभागातील १० अधिकारी व ६३ पोलिस अंमलदार लाठी, हेल्मेटसह सहभागी झाले होते.